Home बातम्या बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या पंचायती बरखास्त करा : राणे

बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या पंचायती बरखास्त करा : राणे

0

सरकारने पंचायत निवडणुका घाईगडबडीत घेतल्याचा आरोप करून बेकायदेशीर बांधकामे व गैरव्यवहारात गुंतलेल्या पंचायती बरखास्त करण्याची मागणी विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल पंचायती, आरोग्य या खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेच्या वेळी कपात सूचनेस पाठिंबा देणार्‍या आपल्या भाषणात केली.

घरांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली विस्तार केला जातो. या प्रकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून पंचायत सचिवही गैरव्यवहारात गुंतल्याचे ते म्हणाले. आरोग्य खात्यावर बोलताना राणे यांनी डॉक्टरांना पात्रतेप्रमाणे वेतन मिळणे आवश्यक असल्याचे सांगून गोव्यात अत्याधुनिक, सुपरस्पेशल आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची मागणी राणे यांनी केली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छता नसल्याचे त्यांनी सांगितले.