बॅगेतून एक लाख लंपास

0
53

मडगावात भर दुपारी एका कारमधून १ लाख रुपये लंपास करण्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार वेळसांव – उतोर्डा येथील कनकराज हे आपल्या कारमधून मडगावच्या एसजीपीडीए मार्केटजवळ आले व सोबत असलेली बॅग कारमध्ये ठेवली व जवळच असलेल्या एका दुकानात गेले.

थोड्या वेळाने येऊन पाहतो तो त्याची बॅग गायब झाली होती. या बॅगमध्ये रोख १ लाख रुपये होते. शिवाय त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट होता. त्यांच्या घराचे बांधकाम केलेल्या एका कंत्राटदाराला ही रक्कम देण्यासाठी त्यांनी ती आणली होती