बूस्टर डोसच्या कालावधीत कपात

0
14

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसर्‍या डोसनंतर बूस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावे लागत होते; मात्र नव्या निर्णयानुसार दुसर्‍या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.