Home बातम्या बुडालेल्यांपैकी एक मृत्यूमुखी

बुडालेल्यांपैकी एक मृत्यूमुखी

0

परवा सायंकाळी बागा कळंगुट दरम्यान समुद्रात प्रवासी बोटीतील दोघेजण बुडाले होते. त्यांना बांबोळी येथे गोमेकॉत उपचारांसाठी दाखल केले असता उपचार चालू असताना विनू थॉमस(२९) भोपाळ-मध्यप्रदेश हा मरण पावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासी बोटीतून एकूण १४ जण समुद्रात जलसफरीसाठी गेले होते. त्यातील विनू थॉमस व हेल्पर सबाना ओडी (२५) समुद्रात बुडाले होते. कळंगुट पोलिसांनी निष्काळजीपणे बोट चालविल्याबद्दल बोटचालक वासू मुणसी व हेल्पर सबाना ओडी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.