बुडणार्‍या व्यक्तींना आत अग्निशमन दल वाचवणार

0
26

बुडणार्‍या व्यक्तींना वाचवण्यासाठी आता अग्निशमन दलाची मदत घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या ‘आपदा मित्र-सखी’ योजनेखाली प्रशिक्षण पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी कार्य करणार्‍यांना सरकारतर्फे मानधन दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व अग्निशमन सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा सखी व मित्र योजनेखाली ३७ प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आपदा सखी व मित्र ही स्वेच्छा सेवा असून, त्यासाठी युवक-युवतींनी स्वतः पुढे येऊन त्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतले असल्याचे ते म्हणाले. हे प्रशिक्षण घेतलेल्यांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.