बिहार : मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

0
58

बिहारमधील एका पंचायतीने मुलींना मोबाईल वापरण्यावर बंदी लागू केली आहे. शिवाय मुलींना आखूड व तंग कपडे घालू नयेत असाही आदेश जारी केला आहे. बिहारची राजधानी पटनापासून १५० कि. मी. अंतरावरील सिसवान पंचायतीने असेही स्पष्ट केले आहे की, आदेश मोडणार्‍यांना दंड ठोठावला जाईल.

बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरील निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्व परिवारांना याबाबत कळविण्यात आले असून आदेशाचा भंग झाल्यास रु. ५ हजार दंड वसूल करण्यात येणार आहे. दरम्यान, बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी एका पंचायतीने शालेय विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली होती.