बिहारमध्ये बोट उलटली40 ही प्रवासी वाचले

0
9

नेपाळमध्ये सततच्या पावसामुळे बिहारमधील कोसी, बागमतीसह अनेक नद्यांना पूर आला आहे. याच दरम्यान रविवारी सीतामढी जिल्ह्यातील रुन्नीसैदपूर येथील बागमती नदीत 40 जणांनी भरलेली एक बोट उलटली. बोट उलटताच घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. स्थानिक लोकांनी नदीत उडी मारून प्रवाशांना वाचवले. अनेकजण स्वतः पोहून सुरक्षित बाहेर आले. बोटीची क्षमता फक्त 15 ते 20 लोकांची होती.