बिहारच्या मतदारयादीतून 51 लाख मतदार हटवले

0
12

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मतदारयादीच्या पुनरिक्षणानंतर (स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन) 51 लाख मतदारांची नावे मतदारयादीतून हटवली आहेत. काल आयागोने यासंदर्भातील माहिती जाहीर केली. ‘एसआयआर’दरम्यान 18 लाख नावे मृत मतदारांची आढळून आली. त्याशिवाय 26 लाख मतदार बिहारच्या बाहेर किंवा इतर मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांची नावे हटवण्यात आली याशिवाय 7 लाख मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेल्याने ती सुद्धा हटवण्यात आली आहे. नियमानुसार एकाच मतदारसंघात नाव नोंदवता येते; मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यानं ही नावं हटवली गेली आहेत. म्हणजेच एकूण 51 लाख नावे बिहारच्या मतदार यादीतून हटवण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार बिहारमध्ये 7.89 कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी 97.30 टक्के मतदारांनी अर्ज जमा केले आहेत. आता 1 ऑगस्ट 2025 ला प्रकाशित होणाऱ्या प्राथमिक मतदारयादीत त्यांची नावे जाहीर होणार आहेत. आतापर्यंत 2.70 टक्के मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत.