बिभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

0
11

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहाय्यक बिभव कुमार यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता बिभव यांना सीएम हाऊसमधून अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा त्यांना तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी बिभवला 7 दिवसांची कोठडी मागितली होती. दिल्ली पोलिसांच्या वतीने वकील अतुल श्रीवास्तव यांनी बिभवच्या कोठडीबाबत युक्तिवाद केला. बिभव यांना 23 मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. 13 मे रोजी सीएम हाऊसमध्ये बिभव यांनी मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे.