लानी शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या संस्थेतील यंदाच्या वर्षातील पहिला आणि एकूण सहावा मृत्यू आहे. 14 महिन्यांच्या कालावधीत 6 आत्महत्येच्या घटना घडण्यामागे नक्की कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी सुरू केली आहे.
1 फेब्रुवारीच्या रात्री वैष्णवी जितेष या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. यापूर्वी देखील आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीच संस्थेच्या चालकांना तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी आदेश दिले होते.दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मानसिक आरोग्य समिती या घटनेची माहिती मिळवित आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्याविषयीच्या अहवालानंतर पुढील पाऊले उचलली जातील, असे एग्ना क्लिटस यांनी सांगितले.

