या समारंभाच्या व्यासपीठावर आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, प्रा. रमेश पानसे, सविता तवडकर, सुरेखा दीक्षित आणि कमलाकार म्हाळशी उपस्थित होते. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नाही. शैक्षणिक गुणांचा विचार होणे गरजेचे आहे. शिक्षणाबाबत सकारात्मकदृष्ट्या विचार करणारेच टिकातात. अर्धा तास शाळेची वेळ वाढविल्यानंतर सर्वात आधी शिक्षकानीच विरोध केला असे सांगून समाजात विश्वास वाढीस लागण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दोन दिवस घेतलेल्या या अधिवेशनात अनेक मागण्या पुढे आल्या. गोवा सरकारने अंगणवाडी, बालवाडी, शिशुवाटिका तसेच के. जी. व तत्सम केंद्रात प्रवेश घेणार्यांचे नियम ठरवावेत, मूल कसे शिकते यावर कार्यशाळा घ्यावी, बालकांच्या स्वयंप्रेरणा, स्वयंस्फूर्तीला, निर्णयक्षमतेला, निर्भयतेला वाव देण्यासाठी मार्गदर्शक तत्व प्रणाली निर्माण करावी, सक्षम शिक्षक तयार करावेत, स्वतंत्र बाल शिक्षण मंडळ स्थापन करण्यात यावे, प्राथमिक वर्गाना जोडूनच पूर्व व प्राथमिक शिक्षण वर्ग असावेत आणि त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध असाव्यात या मागण्यांच्या ठरावांचा समावेश होता. अधिवेशानात संमत ठरावांची प्रत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
ठरावाचे वाचन महेंद्र फळदेसाई यांनी यावेळी क्रीडा मंत्री रमेश तवडकर,. प्रा. पानसे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर म्हाळशी यानी तर सविता तवडकर यानी स्वागत केले. गोमंतक बाल शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा दिक्षित आणि काही प्रतिनिधीनी यावेळी मनोगत सादर केले. दामोदर वेळीप, फॅनी फर्नांडिस, स्मीता कोमरपंत, वंदना सुदीर यानी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. स्वाती नाईक यानी शेवटी आभार मानले.