पणसुलेमळ खोतीगाव येथील तेजा रमाकांत वेळीप (२३) या विवाहित महिलेने आपल्या अडीच महिन्याच्या कोवळ्या बालिकेसहित घरालगतच्या विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या करण्याची दुर्घटना घडली. मृत बालिकेचे नाव रीना असे आहे. विवाहित महिलेचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते.
नेहमीप्रमाणे ६ रोजी जेवण घेऊन झोपलेली सदर महिला अंथरुणावरून गायब झाल्याचे दृष्टीस पडल्यानंतर शोधा शोध घेतल्यानंतर घरा शेजारच्या विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले. काणकोणच्या पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मरणोत्तर तपासणीसाठी शव ताब्यात घेतले आहे. तिच्या आत्महत्त्येचे नेमके कारण समजू शकले नाही. काणकोणचे निरीक्षक हरिष मडकईकर पुढील तपास करीत आहेत.