बार्देश बझारचे विद्यमान अध्यक्ष धर्मा चोडणकर यांच्यासह तेरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. संचालक मंडळाच्या चौदा जागांसाठी केवळ तेराच उमेदवार असल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार सहकार खात्याच्या निर्वाचन अधिकार्यांनीही निवडणूक घेतली. चौदा जागांसाठी केवळ १३ उमेदवार पात्र ठरले. त्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात विद्यमान अध्यक्ष धर्मा चोडणकर, उपाध्यक्ष महादेव नाटेकर, डॉ. रामकृष्ण मोरजकर, गुरुनाथ धुळापकर, जयवंत नाईक, गुरुदास सावळ, एकनाथ नागवेकर, रवींद्र फोगेरी, नारायण राठवड या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. त्याशिवाय चंद्रकांत शेटगावकर, रघुवीर देसाई, विश्वास नाईक व गोकुळदास शिरोडकर यांचीही निवड झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी एकही अर्ज न आल्याने आमसभेत ही जागा भरण्यात येईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेणार्या खास आमसभेत विजयी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल.

