बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात चुका

0
98

२ मार्चपासून सुरू होणार्‍या बारावीच्या परीक्षेसाठी गोवा शालांत मंडळाने ऑन लाईन जाहीर केलेल्या वेळापत्रकात त्रुटी असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. गोवा बोर्डाने ऑन लाईन प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकात मंगळवार दि. ३च्या ऐवजी बुधवार दि. ३ असा उल्लेख आहे. शिवाय ३ रोजी पेपरच ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे मंगळवार दि. ५ रोजी अकौंटन्सी, पदार्थविज्ञान, इतिहास असे पेपर ठेवण्यात आले आहेत. ५ रोजी गुरूवार असून त्यादिवशी चक्क मंगळवार असे सदर वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. अक्षम्य अशा या चुका असून विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे गोंधळ निर्माण होण्याची भीती काही पालकांनी व्यक्त केली आहे.