गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार दि. २२ रोजी संध्या. ४ वा. जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, विविध तालुक्यांतील शाळांना दि. २३ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पुढील व्यवस्थेनुसार गुणपत्रिका वितरित केल्या जातील.
बार्देेश, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी आणि फोंडा या तालुक्यांतील शाळांना पर्वरी येथील बोर्डाच्या कार्यालयात गुणपत्रिका मिळतील तर काणकोण, केपे, सांगे, सासष्टी आणि मुरगाव या तालुक्यांतील शाळांना गुणपत्रिका दक्षिण विभागीय कार्यालय मडगाव येथून त्या स्वीकारता येतील.
नियमित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत मिळणार असून वैयक्तिकरित्या परीक्षेस बसलेल्यांनी गुणपत्रिका बोर्डाच्या पर्वरी येथील कार्यालयातून न्याव्यात असे म्हटले आहे.
दरम्यान, ुुु.शुराशींल.लेा, ुुु.ळपवळरीर्शीीश्रीं.लेा, हींींि://ठर्शीीश्रींी.ॠेरएर्वीलरींळेप.पशीं या संकेतस्थळांवरही निकाल उपलब्ध असेल.