29 C
Panjim
Friday, October 23, 2020

बारावीचा घोळ

गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या बारावीच्या परीक्षेतील सावळागोंधळ आता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीनंतर लखलखीतपणे उघड्यावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरतपासणीत जी प्रचंड तफावत दिसते, ती पाहाता उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन जागरूकपणे झाले होते की नाही असा प्रश्न पडतो. उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीत गुणांचा प्रचंड फरक दिसून येतो आहे. अशावेळी दोन – चार गुणांचा फरक समजून घेता येतो, पण तब्बल वीस – बावीस गुणांपर्यंत जेव्हा हा गुणांचा फरक पोहोचतो, तेव्हा ज्यांनी पूर्वी या उत्तरपत्रिका तपासल्या त्यांच्या एकूण वकुबाबाबत शंका येणे स्वाभाविक आहे. उत्तरपत्रिका तपासताना ही मंडळी झोपा काढत होती काय, असा प्रश्नही कोणाला पडला तर आश्चर्य नाही. बारावीच्या परीक्षेत यंदा सर्वाधिक घोळ आहे तो इंग्रजी विषयात. इंग्रजी हा भाषा विषय असल्याने त्याच्या मूल्यांकनाचे ठोकताळे इतर विषयांसारखे नसतात हे जरी खरे असले, तरीही असंख्य मुलांना फेरतपासणीनंतर १५, १६, १८ गुण जादा मिळतात याचा अर्थ काय? फेरतपासणीअंती ८ ते १२ गुण अधिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तर फार मोठी आहे. केवळ इंग्रजी विषयातच हा प्रकार आहे असेही नाही. इंग्रजीखालोखाल अशी तफावत दिसते ती मानसशास्त्र विषयात. तेथे गुणांची फेरतपासणी मागणार्‍या ह्रषिकेश दाभेकर या विद्यार्थ्याला तब्बल २२ गुण जादा मिळाले आहेत. इतर विषयांतही परिस्थिती वेगळी नाही. पदार्थविज्ञानशास्त्रात अश्वथीकुमार या विद्यार्थ्याला २३ गुण जादा मिळालेले दिसतात, तर बिझनेस स्टडीज विषयात मनमित तिंबले या मुलाला १७ गुण जादा मिळाले आहेत. अकरा, बारा, दहा असे जादा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची नामावली तर खूप मोठी आहे. फेरतपासणीत एवढा गुणांचा फरक पडल्याने साहजिकच या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या एकूण टक्केवारीत मोठा फरक पडला आहे. काही विद्यार्थ्यांना तर एकाहून अधिक विषयांमध्ये असे वाढीव गुण मिळाले आहेत. एकेका गुणासाठी ही मुले आणि त्यांचे पालक जिवाचे रान करतात. असे असताना बारावी परीक्षेत हा जो काही घोळ घातला गेला आहे, तो संतापजनक आहे. त्याकडे अतिशय गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. नवप्रभेने ९ जूनच्या अंकात पहिल्यांदा या घोळाला वाचा फोडली होती. फेरमूल्यांकनाच्या अधिकृत याद्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आणि या घोळाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात आले. विशेषतः फेरमूल्यांकनाची जी दुसरी यादी मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे, तिच्यावर एक धावती नजर जरी टाकली, तरी यंदाच्या बारावीच्या परीक्षेत काय झाले असेल त्याची पुरेपूर कल्पना येते. बरे, हे गुण केवळ फेरमूल्यांकनाची मागणी करणार्‍या विद्यार्थ्यांचे आहेत. म्हणजेच असे हजारो विद्यार्थी असतील की ज्यांनी मंडळावर आणि परीक्षकांवर आंधळा विश्वास ठेवला आणि फेरमूल्यांकनाची मागणी केली नाही. खेड्यापाड्यांतील सगळेच पालक आपल्या पाल्याविषयी एवढे दक्ष असतात असेही नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनाचे अर्ज भरले नाहीत, त्यांच्यावर तर सरळसरळ अन्याय झाला आहे. यासंदर्भात आम्ही मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांच्याशी संपर्क साधला तेव्हा केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत दिसून आल्याचा दावा त्यांनी केला होता. पण मंडळानेच जारी केलेल्या दुसर्‍या अधिकृत यादीकडे पाहिले तर ही संख्या कितीतरी अधिक भरते. भगदाड पडलेले दिसत असताना जणू काही मोठे झालेलेच नाही असे भासवून पेपर तपासनिसांच्या चुकांवर आणि स्वतःच्या जबाबदारीवर पांघरूण घालण्याची ही वृत्ती निषेधार्ह आहे. या विद्यार्थ्यांचे पालक संघटित नाहीत, विद्यार्थी संघटना झोपल्या आहेत, म्हणूनच मंडळाचे या प्रकरणात फावले आहे. विशेष म्हणजे राज्याचे शिक्षण खाते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे. ते स्वतः शिक्षणसंस्था चालवतात. किमान त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून या प्रकारावर कारवाई करणे अपेक्षित आहे. बिहारच्या परीक्षांतील ‘टॉपर्स’चा घोटाळा नुकताच उजेडात आला आणि तेथील शिक्षणाच्या एकूण दर्जाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. गोव्याच्या शैक्षणिक दर्जाची लक्तरे अशी वेशीवर टांगायची नसतील, तर पेपर तपासणीतील या गलथान कारभाराकडे संबंधितांनी वेळीच लक्ष द्यावे लागेल. तपासणीतील या घोळामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर झालेच, परंतु निदान यापुढे अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार काही पावले उचलील काय?

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

पंतप्रधानांचा इशारा

पक्की खेत देखिके, गरब किया किसान | अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान ॥ हा कबिराचा दोहा उद्धृत करीत पंतप्रधान...

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

कोरोनाची घसरण

गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून गेले काही दिवस कोरोनाच्या फैलावाने गोव्यासह देशामध्ये थोडी उसंत घेतल्याचे पाहायला मिळते आहे. मागील...

काश्मीरची हाक

‘पाचामुखी परमेश्वर’ असे म्हणतात, परंतु जेव्हा काश्मीर खोर्‍यातील पाच प्रादेशिक पक्षांचे म्होरके एकत्र आले तेव्हा त्यांच्या तोंडून जणू सैतानच वदू लागला आहे....