ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव (वय 95) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ही त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. फुफ्फुसात बिघाड झाल्याने डॉ. बाबा आढाव यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.