‘बागा बीच’ आजपासून चित्रपटगृहात

0
81
३० मे रोजी गोवा घटक राज्यदिनाचे औचित्य साधून त्या दिवशी चित्रपट गोव्यातील विविध चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. पणजीतील आयनॉक्स व सम्राट, मडगाव येथील ओसिया व सिने विशांत, डिचोलीतील हिरा टॉकीज, पेडण्यातील नंदी व वास्कोतील ‘टू स्क्वेअर’ या थिएटर्समधून रोज एक खेळ संध्याकाळी ६ वा. होणार आहे.

प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी चित्रपटाचे प्रोमो तयार करण्यात आलेले असून ते स्थानिक केबल वाहिन्यांवरून दाखवण्यात येणार आहेत. गोमंतकीय चित्रपट रसिकांनी मोठ्या संख्येने हा चित्रपट पहावा व कोकणी चित्रपटांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन यावेळी लक्ष्मीकांत शेटगावकर व प्रमोद साळगावकर यांनी केले. या चित्रपटात राजेश कारेकर, प्रदीप नाईक, प्रशांती तळपणकर, गोपीनाथ गावस, आयवन डिसोझा, अभिषेक विश्‍वकर्मा या स्थानिक कलाकारांबरोबरच हिंदी अभिनेत्री सारिया सिद्धीकी, बंगाली अभिनेत्री पावली दाम, आकाश सिन्हा व दोघा विदेशी अभिनेत्यांनीही अभिनय केला आहे.