६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाली.
यावेळी आनंद गांधी यांच्या ‘शिप ऑफ थेसस’ या फिल्मला उत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा लोकप्रिय सिनेमा गटात उत्कृष्ट चित्रपट ठरला. प्रादेशिक गटात लक्ष्मीकांत शेटगावकर यांच्या ‘बागा बीच’ चित्रपटाला उत्कृष्ट कोकणी चित्रपट म्हणून पारितोषिक मिळाले. मराठी भाषेत ‘आजचा दिवस माझा’ सिनेमाला पुरस्कार मिळाला. इंग्रजी भाषेत गोव्यात चित्रित झालेल्या ‘कॉफिन मेकर’ सिनेमाला पुरस्कार मिळाला. हिंदीत ‘जॉली एलएलबी’ उत्कृष्ट फिल्म ठरली.
हंसल मेहता यांना ‘शाहीद’साठी दिग्दर्शनाचा, राजकुमार राव व सुरज वेंजारामूडू यांना विभागून अभिनयासाठी पारितोषिक मिळाले. गीतांजली थापा उत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पहिल्या सिनेनिर्मितीसाठी देण्यात येणारा इंदिरा गांधी पुरस्कार ‘फँड्री’ चित्रपटाला मिळाला. मराठीत महेश लिमये दिग्दर्शित ’यलो’नेही दोन पुरस्कार पटकावले. ’यलो’ला स्पेशल ज्युरीचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच यातील बालकलावंत गौरी गाडगीळ हिच्या अभिनयाची ’विशेष दखल’ घेण्यात आली आहे.

