बांधकाम साहित्याच्या मूल्यवर्धित करात वाढ

0
51

गोवा सरकारने काल बांधकामासाठी लागणार्‍या लाकडावरील मूल्यवर्धीत कर ५ टक्क्यांवरून १२ टक्के असा वाढवला. त्यासाठीची अधिसूचना काल अर्थखात्याने काढली. बांधकामासाठीच्या या लाकडावरील मूल्यवर्धीत कर वाढवण्यात आल्याने सरकारचा महसूल वाढण्यास मदत तर होणार आहेच, शिवाय या लाकडाचा जो काळाबाजार चालू होता तो बंद होण्यासही मदत होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

काही जण हे लाकूड आणून त्याला रंग फासून ते प्लायवूड म्हणून विकत असत. सरकारच्या वाणिज्य खात्याने यापूर्वी इमारती बांधताना लागणार्‍या काचेवरही मूल्यवर्धित कर वाढवला होता. यामुळे सरकारचा महसूल वाढणार असला तरी अप्रत्यक्षरित्या सदनिकांचे दर वाढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे