बांधकाम खात्यातील मजुरांना गोव्यातच थांबण्यासाठी विनंती करणार ः पाऊसकर

0
214

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांना परराज्यात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांचे मन वळवून त्यांना येथेच थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली.

राज्यातील मजूर परत गेल्यास विविध विकास कामांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे ८० हजारांपेक्षा जास्त मजुरांनी परराज्यत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात परत जाण्यासाठी इच्छुक मजुरांना आम्ही थांबवू शकत नाही. मजूर वर्ग परत गेल्यास विकासकामे मार्गी लावण्यात मोठी अडचण निर्माण होणार आहे. परत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांचे मन परिवर्तन करण्याची गरज आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

समुपदेशन करा – मनोज काकुलो
आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या मजुरांचे समुपदेशन करावे, अशी मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोज काकुलो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.