बांदा-झाराप मार्गावर अपघात,मडगावच्या युवतीचा मृत्यू

0
15

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी मार्गावर वेत्ये येथे काल सोमवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात शोभा ॲन्थनी फर्नांडिस (21, रा. मडगाव) हिचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत. मडगाव व कुंकळ्ळी परिसरातील काही तरुण-तरुणी दुचाकींवरून आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी जात होते. हे सर्वजण वेत्ये परिसरात आले असता, पुढे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागून वेगाने येणारी बुलेट दुचाकी पुढील वाहनावर जोरदार आदळली. या भीषण धडकेत बुलेटच्या मागील सीटवर बसलेली शोभा फर्नांडिस हिचा मृत्यू झाला तर बुलेट चालकासह अन्य एका दुचाकीवरील दोन तरुण असे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये गोव्यातील एक तर अन्य दोघे मडुरा येथील रहिवासी आहेत.