बसवाल्यांविरुद्ध विद्यार्थ्यांची मडगावात निदर्शने

0
63

खासगी बसेस विद्यार्थ्यांना बस तिकीटात पन्नास टक्के सवलत देण्यात टाळाटाळ करतात व बसमध्ये घेतल्यानंतर विद्यार्थ्यांशी उद्धटपणे वागत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनेने कदंबा बसस्थानकावर निदर्शने केली.

कदंब बसस्थानकाजवळ विद्यार्थ्यांनी खासगी बसेस अवडताच खासगी बस चालकांनी कदंबाच्या बसेस अडविल्या व दोन्ही गटामध्ये वादावादी सुरू झाली. त्यानंतर पोलीस तेथे पोहचले व त्यांनी विद्यार्थ्यांना अटक केली. मडगाव पोलिसांनी समज देऊन त्याना सोडून दिले. भाजपाचे रूपेश महात्मे व युवा भाजपा त्यांना सोडविण्यासाठी पोलीस स्टेशनवर गेले होते.