बसमध्ये अश्‍लील वर्तन; अटक

0
54

एका २३ वर्षीय युवतीशी अश्‍लील चाळे व असभ्य वर्तन भर बसमध्ये केल्याच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी आज दुपारी शेखर वर्मा (३४) या छत्तीसगड येथील युवकास अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अडीच वाजण्याच्या सुमारास सदरची युवती करासवाडा येथे एका बसमध्ये बसून पणजीकडे जात होती. ती बस म्हापसा स्थानकावर आली असता तेथे संशयित शेखर वर्मा बसमध्ये चढला व या युवतीच्या शेजारी सिटवर बसला. त्याने तिच्याशी अश्‍लिल चाळे करण्यास सुरुवात केली. त्यावर ती उठून पुढे गेली असता पुन्हा त्या ठिकाणी आपण गेला. या प्रकाराबाबत युवतीने आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगितले असता पणजी येथे या युवकास पणजी पोलिसांनी अटक करून म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम नाईक यांनी पंचनामा करून त्याला अटक केली व पुढील तपास करीत आहेत.