बलुचिस्तान प्रांतात मंगळवारी झालेल्या शक्तीशाली भूकंपाच्या बळींची संख्या किमान २७० झाली असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे अनेक घरे, इमारती जमीनदोस्त झाल्या असून हजारो लोकांनी मंगळवारची रात्र उघड्यावर घालवली.
या भूकंपाच्या परिणामस्वरूप समुद्रकिनार्यानजीक २०० मी. लांब, १०० मी. रुंद व २० मी. उंचीचे एक बेटही तयार झाले आहे. बलुचिस्तान प्रांत भूकंपप्रवण म्हणून ओळखला जातो. गेल्या एप्रिल महिन्यात इराणमध्ये झालेल्या भूकंपावेळीही या ठिकाणी ३५ लोक मरण पावले होते.