एका 37 वर्षीय महिलेवर बळजबरी करून बलात्कार केल्या प्रकरणी वाळपई पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वाळपई पोलिसांनी या प्रकरणी विठ्ठल झोरे (रा. अनसोळे) याला अटक केली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. वाळपई पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एका महिलेला आपल्या चारचाकी वाहनातून रेडीघाट येथे नेत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सदर महिलेने वाळपई पोलीस स्थानकात विठ्ठल झोरे याच्याविरोधात तक्रार दिली होती.

