Home बातम्या बलात्कार प्रकरणी कुडचड्यातील दोन युवकांना अटक

बलात्कार प्रकरणी कुडचड्यातील दोन युवकांना अटक

0

एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून केपे पोलिसांनी कुडचडे येथील दोन युवकांना काल संध्याकाळी अटक केली.
केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दांडो-सांगे येथे राहणार्‍या मूळ आमडई-सांगे येथील एका २३ वर्षीय तरुणीला बुधवार दि. २४ रोजी मळकर्णे येथे नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार केला असल्याची तक्रार काल संध्याकाळी नोंद करण्यात आली.
केपे पोलिसांनी या बलात्कार प्रकरणात देवतेवाडा-कुडचडे येथील गंगाधर सुमण्णा कालेकर (२६) व खामामळ-कुडचडे येथील मुन्नावर हुसेन पठाण (२५) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी व सदर पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३७६ कलम ३४ खाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.