महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविणे तसेच बलात्काराची प्रकरणे ध्रुतगती न्यायालयांत चालविणे अशा मागण्यांचा समावेश असलेल्या विविध जनहित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात न्या. के. एस. राधाकृष्णन आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. टीव्ही व अन्य प्रसार माध्यमांना स्त्रियांची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्यास बंदी घालण्याच्या मागणीबाबतच्या जनहित याचिकेवरही याचवेळी सुनावणी होणार आहे.
बलात्कार पीडित स्त्रीस भरपाईची शास्वती देणारा नियम बनविण्याची मागणी अन्य एका जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

