बरेली येथे कॉंग्रेसच्या मॅराथॉनमध्ये चेंगराचेंगरी

0
12

बरेलीमध्ये मंगळवारी सकाळी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक लहान मुली गर्दीत दबल्या गेल्या. मॅरेथॉनला मोठी गर्दी झाली होती. सकाळी १० वाजता मॅरेथॉन सुरू होताच पुढे धावणार्‍या मुलींना धक्का लागल्याने त्या खाली पडल्या व मागून येणार्‍यांच्या पायाखाली त्या तुडवल्या गेल्या. या चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी झाल्या.

दरम्यान, या घटनेचे वृत्त दिल्याने कॉंग्रेस नेते माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेले. माध्यमांशी गैरवर्तन केले. तर माजी महापौर आणि कॉंग्रेस नेत्या सुप्रिया आरोन यांनी वैष्णोदेवी मदिरात चेंगराचेंगरी होऊ शकते. ही तर मुलींची गर्दी आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या ‘लडकी हूं – लाड सकती हूं’ या मोहिमेअंतर्गत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.