गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत 2026 मध्ये क श्रेणीमधील 215 पदांसाठी भरती केली जाणार असल्याचा दावा करणाऱ्या एका बनावट जाहिरात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही अनधिकृत जाहिरात ‘एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचार’ नावाच्या फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात आली होती आणि ती गोवा कर्मचारी निवड आयोगाची अधिकृत सूचना असल्याचे भासवले गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही जाहिरात कोणी तयार केली आणि प्रसारित केली, याचा तपास पोलीस करत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नये किंवा त्यास प्रतिसाद म्हणून आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, तसेच कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

