बदायूं बलात्कारप्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्यांची निदर्शने

0
47
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यालयाच्या दिशेने महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला असता त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या बंबांद्वारे फवारे सोडल्याने परिस्थिती चिघळली. समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करावे अशी मागणी निदर्शक करीत होते. निदर्शने संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेश भाजप प्रमुख लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला.

त्यामुळे येथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली. त्याआधी सकाळी केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान यांनी वरील प्रकरणातील पीडित मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपण त्यांचा प्रश्‍न पंतप्रधानांशी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. अखिलेश यादव सरकारवर त्यांनी टीका केली. पीडित कुटुंबियांची यादव यांनी भेट न घेतल्याबद्दलही त्यांनी टीका केली. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र चिराग पास्वान हेही होते.

‘बदायूं’ प्रकरणी संयुक्त राष्ट्रांकडून निषेध

उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा संयुक्त राष्ट्र संघाने तीव्र निषेध केला असून आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच भारतातील महिला व मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही त्यांनी केली. ग्रामीण भारतात खालच्या जातीतील महिला व मुलींना लक्ष्य केले जाते. बलात्कार, अत्याचार केले जातात. हा केवळ महिला अत्याचाराचा विषय नसून मानवी हक्कांचा विषय आहे. अशी प्रतिक्रिया भारतातील संयुक्त राष्ट्र निवासी निमंत्रक लिसे ग्रांद यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान की मून यांनीही असाच सूर व्यक्त केला आहे.
कॉंग्रेसच्या नेतेपदी