32 C
Panjim
Thursday, November 26, 2020

बदल हा अनिवार्यच!

  • पल्लवी पांडे

कोरोनानंतर कदाचित आपल्याला बदललेल्या भारताचं चित्र बघायला मिळेल, जे रेखाटायला अर्थातच आपल्याला हातभार लावायचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण शेवटी बदलणं ही काळाची गरज आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जग एक खूप मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. ते संकट म्हणजे कोरोना व्हायरसचे संक्रमण, ज्यामुळे माणसे अगदी किडे-मुंग्यांसारखी मरत आहेत. त्याला कारण म्हणजे शेवटपर्यंत लक्षात न येणारी या रोगाची लक्षणे आणि योग्य त्या उपचारपद्धतीचा अभाव. ह्या सर्व परिस्थितीमुळे घाबरलेली जनता बहुतेक इतर आजारांना पण बळी पडताहेत- जसे उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, इत्यादी.

वृत्त वाहिन्या त्यांच्या परीने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे. ‘डब्लूएचओ’ने सांगितलेली नियमावली ते आपल्यापर्यंत पोहोचवीत आहेत. पण हळूहळू अभ्यासातून हे लक्षात आलं की एकमेकांच्या जास्त संपर्कात राहून हा रोग बळावतो आहे. म्हणून मग सगळ्यात पाहिला उपाय म्हणजे संपूर्ण जगात लॉकडाऊन (टाळेबंदी) सुरु झाले. वाहतुकीची साधने बंद झाली. पर्यटन स्थळे बंद झालीत आणि माणसे अक्षरशः आहेत तिथेच थांबली किंवा अडकली. असे काही महिने चालू होते. त्यामुळे जगातील अर्थव्यवस्था आणि माणसाचे जीवन खूप बदलले आणि अर्थातच अर्थव्यवस्थेला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. ही विस्कळीत घडी बसवण्यासाठी सर्व व्यवहार परत सुरु झालेले आहेत. पण पुन्हा काही शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

‘धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे!’ हे आपण सगळेच जाणतो.
परत सगळे व्यवहार सुरु झाल्यानंतर अर्थातच त्यात काही बदल अनिवार्य आहेत ते मानवाच्या सुरक्षिततेसाठी कारण कोरोना हा आजार काही रातोरात जाणार नाही. आपण आता पाळत असलेलं सोशल डिस्टंसिंग (सामाजिक अंतर), मास्कचा वापर आणि वारंवार निर्जंतुकीकरण हे सगळं इथून पुढे काही महिने किंवा एखाद वर्षतरी आपल्याला पाळत राहावंच लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या जीवनात काही आमूलाग्र बदल केले आहेत ते म्हणजे —

  • शक्य तितके एकमेकांपासून दूर राहणे, घरात स्वच्छता ठेवणे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, फळे- भाज्या, किराणा सामानाच्या पिशव्या निर्जंतुक करणे, बाहेर जाताना मास्क लावणे, दुकानांमध्ये गर्दी न करता ठराविक अंतर ठेवून उभे राहणे, हस्तांदोलन- गळाभेट टाळणे, खूप गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि हळूहळू ह्या सगळ्यांची आपल्याला सवयपण लागली आहे.
    टाळेबंदी संपून हळूहळू सगळे जीवन सुरळीत होईल पण ह्याचे स्वरूप जरा बदललेले राहील.
    आता प्रवास हा आवश्यक असेल तरच केला जाईल. मौज किंवा केवळ इतरांना दाखवण्यासाठी केलेले पर्यटन लोक टाळतील. खूप गर्दीचा आम्ही एक भाग आहोत असे अभिमानाने सांगणारे त्याच गर्दीतून निसटतांना दिसतील.

वीकएंड औटींग जरा कमी होईल. हॉटेल, पर्यटन स्थळे यांना पण निर्बंधाना सामोरे जावे लागणार आहे. स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे सगळे नियम पाळावे लागणार आहेत.
कोरोनामुळे जिवाच्या भीतीने लाखो लोक आपल्या गावी गेल्याचे आपण पाहतो आहे ज्यामुळे अनेक उद्योगधंद्यांना जबर फटका बसल्याचे आपण ऐकतो आहे. हे मजूर कधी परततील किंवा परतणार नाही हे आपण सांगू शकत नाही. अश्या परिस्थितीत आहे त्या कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योग पुन्हा सुरु करणे हे खूप मोठे आव्हान आहे.

आर्थिक मंदी आली आहे. रातोरात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे पुढे काय?.. हा खूप मोठा प्रश्न नवीन पिढीसमोर उभा आहे. ह्यातूनच आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे स्वयंरोजगारावर आता भर देणे आवश्यक आहे. आपल्यात असलेल्या कौशल्याचा वापर करून त्याला जर छोट्या-मोठ्या अर्थार्जनाचा मार्ग बनवता आला तर त्यात फायदा आहे. थोडक्यात काय तर मोदींनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनण्याकडे सगळ्यांचा कल राहील.
शक्य तितक्या ठिकाणी कॅशलेस व्यवहार होतील. हॉटेल्स, पर्यटन स्थळे या ठिकाणी काम करणारे तसेच बसचालक यांना मास्क वापरणे अनिवार्य राहील. कॅशलेस व्यवहार जिथे शक्य होणार नाही तिथे कदाचित दानपेट्या ठेवून त्यात आपण घेतलेल्या मालाची पूर्ण किंमत टाकण्याचा पर्याय राहील, म्हणजे पैसे परत करण्याची गरज उरणार नाही आणि त्याद्वारे होणारा संसर्ग टाळता येईल.

शाळांपेक्षाही जिथे एका वर्गात जास्त विद्यार्थी असतात असे शिकवणी वर्ग आता बंद होऊन ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु होतील. ई-लर्निंगला आता इतर देशाप्रमाणे आपल्या देशातही वेग येण्याची शक्यता आहे. परीक्षांचे स्वरूप बदलेल. जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) व ऑनलाईन परीक्षा होतील जेणेकरून एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यात येईल.
ह्या सर्व परिस्थितीमुळे परदेशात शिक्षण, नौकरी किंवा परदेशातील मुलं-मुली यांचा लग्नासाठी विचार करणे.. त्यांनाच प्राधान्य देणे.. ही मानसिकता भविष्यात कमी होताना दिसेल.
ऑनलाईन खरेदी, विदेशी वस्तूंची खरेदी ह्यावरपण अंकुश बसेल. लोकांनी स्वदेशीचा प्रचार व प्रसार केला तर अर्थातच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात हातभार लागेल.

काही प्रश्‍न मात्र आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला अजुनही मिळाली नाहीत. आजपर्यंत हे करून ठेवा, आज हा मेन्यू करा असं ज्यांना हक्काने आपण सांगत होतो व ज्या आपल्याला तसा स्वयंपाक करून जेवू घालायच्या त्याच मावशींना आम्ही भीतिपोटी खूप दूर लोटलं आहे. स्वतःचे सण साजरे करण्याआधी आपल्याकडे वडा-पुरणाचा स्वयंपाक करणार्‍या मावशी मात्र आज स्वतःच्या पूर्ण कुटुंबासोबत हलाखीचे दिवस कंठत आहेत. त्यांची कामे त्यांना परत कधी मिळणार हा एक यक्षप्रश्‍नच आहे.

त्याचबरोबर रोजच्या कमाईवर जगणारी, रोजंदारीवर जगणारी अनेक कुटुंब आपल्या गावी परतली आहेत. त्यांच्या रोजगारीचं काय?.. हा प्रश्‍न आहेच. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या कोरोनाच्या महामारीनंतर त्यांच्या आयुष्यात कधी सुख येणार हे आपणही नाही सांगू शकत.
ह्याच काळात अनेक ठिकाणी बंद दुकाने, मग ती किराणा मालाची असो वा सोनाराची, भुयार करून फोडण्यात आली. निर्माण झालेली बेरोजगारी ही चोर्‍या- दरोडे या गोष्टींसाठी तरुणांना उद्युक्त करेल यात शंका नाही.

त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासाठी अविरतपणे झटणारी स्त्री मात्र आज घरगुती हिंसेला बळी पडते आहे, ज्यामध्ये तिचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक मनाने खचलेल्या स्त्रिया आपल्यासमोर येतील कारण सतत बायकोवर अत्याचार करणार्‍या नवर्‍याला या लॉकडाऊनमुळे २४ तास डोळ्यासमोर झेलण्याची कसरत करणे तिला करावी लागते आहे.

ह्या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट सार्‍यांच्या लक्षात आली आहे ती म्हणजे आपण वाढवून ठेवलेल्या आपल्या अवाजवी गरजा आणि सवयी ज्या कमी केल्या तर कमी मिळकतीतही आपण बचत करून सुखी आयुष्य जगू शकतो.
कोरोनानंतर कदाचित आपल्याला बदललेल्या भारताचं चित्र बघायला मिळेल, जे रेखाटायला अर्थातच आपल्याला हातभार लावायचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण शेवटी बदलणं ही काळाची गरज आहे. ह्या बदलातून एक चांगला यशस्वी भारत निर्माण होईल ही आशा करायला काहीच हरकत नाही.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

टेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्?

प्रा. रमेश सप्रे सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार...

नवीन पिढीला समजून घेताना…..

- ऋचा केळकर(वाळपई) ‘‘या नवीन पिढीला कुणाची गरजच नाही जशी, सदान्‌कदा त्या मोबाइलवर नजर खिळवून बसलेली दिसते. ना...

जीवन गाणे व्हावे…

कालिका बापट(पणजी) गोव्यात शिमगोत्सव ते अगदी दिवाळीपर्यंत आणि त्यानंतर कालोत्सव, जत्रोत्सव कलाकारांसाठीचा सीझन असतो, असे म्हणतात. गोव्याच्या कानाकोपर्‍यात...

शेळ-मेळावली आयआयटी प्रकल्प…‘भुतखांब’ तर होणार नाही ना?

डॉ. राजेंद्र रा. साखरदांडे(साखळी) …… हीच प्रगती सरकारला सत्तरीत आणायची का? शैक्षणिक प्रगती आयआयटी आल्याने होणार का? तिथे...

गोष्ट एका ‘हिरकणी’ची!

नीता महाजन(जुने गोवे- खोर्ली) जिजाऊने स्वतःच्या कल्पनेने शिवबाच्या मनात स्वराज्याचं बी रुजवलं. शिवबाला असामान्य असा राजा बनण्याचं प्रशिक्षण...