त्याच्याविरुद्ध भा.दं.सं. कलम ३९३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखालील कारवाईत आगशी पोलिसांनी त्याला अटक केली.काल सकाळी १०.५च्या दरम्यान, एकजण हेल्मेट घालून स्टेट बँकेच्या बांबोळी शाखेत पोचला व सुर्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली.
या तेथील उपस्थित ग्राहकांनी पलायन केले. मात्र बाप्तीस्ता या कर्मचार्याने धैर्याने त्याचा सुरा धरलेला हात पकडल्यानंतर झटापट उडाली. त्यात ती व्यक्ती आपल्या मोटरसायकलने पळून गेली.नंतर पोलीस पंचनाम्यासाठी आले असता हीच व्यक्ती पुन्हा वेगळे कपडे घालून आणि बुटांऐवजी पायात चप्पल घालून पुन्हा बँकेत आली.
त्यावेळी त्याची संशयास्पद हालचाल आणि झटापटी दरम्यान झालेल्या जखमांवरून पोलिसांनी त्याला अटक केली. मयूर गुप्ता याने पोलीस स्थानकात आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

