फ्रान्सिस सार्दिन, वालंका यांना कॉंग्रेसमधून काढावे

0
63
आपला पाठिंबा कॉंग्रेसच्या उमेदवाराला आहे व दक्षिण गोव्यात सर्वांनी तरुण उमेदवार रेजिनाल्ड लॉरेंस यांना पाठिंबा देण्याची मागणी करण्यासाठी आपण आलो आहे असे ते म्हणाले.
आज अनेकजण स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडताना पुन्हा पक्षात येतात असे केल्याने पक्षाची प्रतिमा खालावते. वालंका यांचे वडील चर्चिल आलेमांव तृणमूल कॉंग्रेसतर्फे उभे राहिले तसेच सार्दिन पुत्र शॅलेम हेही निवडणूक लढवित असल्याने वालंका व सार्दिन काही करू शकणार नाहीत.

वालंका आलेमांव यांची कॉंग्रेस प्रचारासाठी दिल्ली आणि बेंगळूर येथे नेमणूक केलेली असली तरी त्या गोव्यात पक्षाला न्याय देऊ शकणार नाहीत. ती फसवणूक ठरते. अशी बेशिस्त माजल्यास प्रादेशिक पक्षांचे फावेल. गोव्यात भाजपा मगो गोवा विकास पार्टीच्या आधारावर उभा आहे. तसे पक्षाचे होता कामा नये. तसेच पक्षांतून गेलेल्या लोकांना पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेस पक्षाचे दरवाजे कायमचे बंद करावेत असेही त्यांनी सांगितले.