फ्रान्सहून भारतात आणखी तीन राफेल विमाने दाखल

0
92

राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत काल बुधवारी आणखी तीन विमाने फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमाने भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसर्‍या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे. भारतीय वायू सेनेने ही तीन विमाने भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिले. राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमाने झाली आहेत.