फोंडा पोटनिवडणूक याचिकेवरीलसुनावणी पूर्ण, निवाडा राखीव

0
4

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी काल पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

फोंड्याचे आमदार, कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या दोन्ही याचिकांवर सुनावणी घेण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 नुसार, निवडून आलेल्या प्रतिनिधीचा उर्वरित कार्यकाळ एका वर्षापेक्षा कमी असल्यास पोटनिवडणूक अनिवार्य नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे. पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या आमदाराला कार्य करण्यासाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

फोंड्याचे आमदार आणि मंत्री रवी नाईक यांच्या ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या निधनानंतरचा कालावधी पोटनिवडणुकीसाठी विचारात घेण्यात आला आहे. हा कालावधी विचारात घेतल्यास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होऊ शकतो, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वकिलांनी केला.