Home बातम्या फेसबुक’वर अश्‍लील साहित्याचा हल्ला

फेसबुक’वर अश्‍लील साहित्याचा हल्ला

0

युवकांच्या संवादाचे आणि संपर्काचे जगातील एक प्रसिद्ध माध्यम बनलेल्या ‘फेसबूक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर हॅकर्सनी आपली वकृदृष्टी केल्याने हे संकेतस्थळावरील अकाउंटधारक संकटाच्या गर्तेत सापडले आहेत.

जगातील लक्षावधी फेसबूक खाती हॅक करून त्यावर अश्‍लील व हिंसात्मक मजकूर व छायाचित्रे टाकली जात असून त्यामुळे खुद्द ‘फेसबुक’चे व्यवस्थापन गोंधळून गेले आहे. भारतातही अनेक ‘फेसबूक’ खातेधारकांनीे आपल्या नावे अश्‍लील मजकूर पसरवला जात असल्याची तक्रार केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, फेसबूकचा वापर करणार्‍यांनी सजग रहावे व आपल्या खात्याची सुरक्षितता ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे.