26 C
Panjim
Monday, January 18, 2021

फुफ्फुसाच्या आजारावर स्टेम सेल थेरपी

  • डॉ. प्रदीप महाजन

मुंबई ‘इंटरस्टिशियल फुफ्फुसा’च्या आजारावर आता स्टेम सेल थेरपी अतिशय फायदेशीर ठरू लागली आहे. याचा प्रत्यय नुकताच आला आहे. एका २० वर्षीय तरूणीला तब्बल सहा वर्षानंतर केवळ स्टेम सेल थेरपी उपचारपद्धतीमुळे फुफ्फुसाच्या या आजारातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. ही तरूणी १४ वर्षांची असल्यापासून तिला श्वास घेताना अडचण जाणवत होती. स्पष्ट बोलताही येत नव्हते. याचबरोबर वारंवार उलट्या आणि पोटाच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवत होत्या. वैद्यकीय चाचणी अहवालात तिला फुफ्फुसाच्या गंभीर आजार असल्याचे निदान झाले.

लहानपणापासून या तरुणीच्या लहान सांध्यात वेदना आणि पहाटेच्या वेळी पाठीत कडकपणा येणं अशी दैनंदिन समस्या जाणवत होती. थंडीच्या दिवसात तिला अधिकच त्रास व्हायचा. गुडघ्यांनाही सूज येत होती. डॉक्टरांना दाखवले तेव्हा तिला संधिवात असल्याचे निदान झाले. इतकंच नाही तर फुफ्फुसही दिवसेंदिवस कमकुवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
अशा फुफ्फुसाच्या आजाराला ‘लंग फायब्रोसिस’ असंही म्हणतात. या आजारात फुफ्फुसांमध्ये चट्टे असतात. हवेची देवाणघेवाण करता येत नसल्याने फुफ्फुसांच्या ऊतींना ताठरपणा येतो. यामुळे रूग्णांना श्वास घेण्यास अडचण जाणवू लागते.

या मुलीला रात्री झोपेत श्वास कोंडण्याचा त्रास होत होता. चालताना अचानक धाप लागायची. प्रथम तिला स्टिरॉइड दिले जात होते. परंतु प्रकृती सुधारत नसल्याने पालकांनी मुलीवर स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीची सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर तिच्यावर थेरपी सुरू करण्यात आली. या थेरपीद्वारे फुफ्फुसाच्या ऊतींचे संपूर्ण आरोग्य सुधारते. यामुळे रूग्णाला श्वास घेताना कोणतीही अडचण जाणवत नाही.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...

आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको

योगसाधना - ४८९अंतरंग योग - ७४ डॉ. सीताकांत घाणेकर सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या-...

सुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड

मंजुषा पराग केळकर होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी...

तापमानात घट ः हदयविकाराचा धोका जास्त

डॉ. बिपीनचंद्र भामरे जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी...

वातरक्त ः एक दारुण आजार

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे....