फा. परेरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

0
22

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याबाबत फा. बोलमॅक्स परेरांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, त्यांनी अटक होण्याच्या शक्यतेने मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज काल सुनावणी आला असता सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागून घेतल्याने त्यावरील सुनावणी आता मंगळवार दि. 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

वास्कोतील चिखली चर्चचे फा. बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवप्रेमींनी वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्यानंतर पोलिसांनी परेरांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
या पार्श्वभूमीवर शनिवारी फा. परेरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारी पक्षाने आपली बाजू न्यायालयात सादर केल्याने त्यावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.