फातोर्डा बंद फसला एकास अटक

0
47

वास्को येथील सात वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्यानंतर गुन्हेगाराला पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ फातोर्डा विकास समितीच्या नावाखाली कामिल बार्रेटो याने काल फातोर्डा बंदचे आवाहन केले होते तो बंद पूर्णपणे फसला. सर्वत्र बाजारपेठ व दुकाने उघडी होती.

मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी कामील बार्रेटो याला सकाळीच अटक केली. काल सकाळी दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्यात बळजबरी करीत असल्याची तक्रार पोलिसांकडे पोहचताच, मडगाव पोलिसांनी बार्रेटोला अटक केली. दुपारी त्यानी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला ऑस्पिसियू हॉस्पिटलांत दाखल करण्यात आले. दरम्यान, बार्रेटो याला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच २५ ते ३० जणांच्या जमावाने पोलीस स्टेशनवर धाव घेऊन त्याला सोडण्याची मागणी केली. पण पोलिसानी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. शनिवारी रात्रौ उशीरापासून फातोर्डा येथे सर्वच पोलीस बंदोबस्त होता. पोलीस निरिक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र गस्त चालू होती. लोकांनी सर्वत्र व्यवसाय चालू ठेवले. आमदार विजय सरदेसाई यांनी कामील बार्रेटो याला दोन दिवसामागे बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. पण कामीलने त्याची मागणी मान्य केली नाही.