राज्यातील नारळ बागायतदारांची पाडेल्यांच्या अभावी गैरसोय होऊ नये यासाठी फलोत्पादन महामंडळाने गोवाभरासाठी ११ पाडेल्यांची नियुक्ती केलेली असून लवकरच आणखी ८ जणांचीही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे फलोत्पादन महामंडळातील सूत्रांनी सांगितले.
महामंडळाने सर्वांत जास्त पाडेल्यांची नियुक्ती सासष्टी तालुक्यात केलेली असून तेथे ५, तर कांसावली- १, वाळपई- १, डिचोली- १, पेडणे- १, धारबांदोडा- १ व फोंडा एक अशी पाडेल्यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, केपे, बार्देश व काणकोण या तालुक्यांत सध्या फलोत्पादन महामंडळाचा एकही पाडेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.