फलोत्पादन मंडळातर्फे आजपासून भाजीविक्री

0
159

गोवा फलोत्पादन महामंडळाने सुमारे ३०० टन भाजी मागविली असून राज्यातील १२३० विक्री केंद्रांतून भाजीचे वितरण बुधवार १ एप्रिलला केले जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष तथा मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदार झांट्ये यांनी वरील माहिती दिली. फलोत्पादन महामंडळाने मागील दोन दिवसांपासून कामकाजाला सुरुवात करून भाजी विक्रीला सुरुवात केली आहे. भाजी विक्री केंद्रातून जीवनावश्यक वस्तू विक्रीवर विचार केला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर मंडळाला भेडसावणारी आर्थिक समस्या मांडण्यात आली आहे, असेही झांट्ये यांनी सांगितले.