26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

फलवर्ग व फळ सेवनाचे नियम

  •  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

ताजी फळे उष्ण ऋतूंत व सुका मेवा थंड ऋतूंत असे साधे फळांच्या सेवनाचे नियम पाळून फळे खाल्ल्यास आपल्याला सगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात.

फ्रुक्टोज म्हणजे केवळ फ्रुट शुगर- फळांमध्ये आढळणारी साखर. या फळातील साखरेने रोग उत्पन्न होत नाहीत, तर आपण जे काही आधुनिकीकरण खाद्यपदार्थांमध्ये केलेले आहे त्याने रोगांना आमंत्रण दिलेले दिसते.

फलवर्ग ः
१. केळी – भारतात प्रायः बाराही महिने मिळणारे, स्वस्त व पौष्टीक फळ आहे. यात प्रथिने, पिष्टमय, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटक आहेत.
– मधुर, शीत असून कफकारक आहे. कफप्रकृतीच्या व्यक्तींनी व कास, श्‍वास विकार झालेल्यांनी खाऊ नये.
– केळी व दूध यांचे शिकरण विरुद्धान्न असल्याने खाऊ नये.
– केळी व साजूक तूप हे मिश्रण खाण्यास हरकत नाही.
२. आंबा – याच्या अनेक जाती आहेत. हापूस आंबा हा चवीला व पोषणाला श्रेष्ठ आहे.
– सर्वच आंबे मधुर, कषाय, अम्लविपाकी व उष्णविर्यात्मक आहेत.
– अम्लपित्त व पित्तप्रकृतीच्या लोकांनी बेताने सेवन करावे.
– कच्चा आंबा भाजून तयार केलेले गुळांचे पन्हे श्रमहर आहे.
– आंब्याचा मावा (रस आटवून केलेला गोळा) जॅम या प्रकारात मोडणारा पौष्टीक पदार्थ आहे. तसेच सारक आहे. म्हणून मलावष्टंभावर उपयोग होतो.
३. डाळिंब – कषाय, मधुर चवीचे, मधुर विपाकी, शीत वीर्याचे आहे.
– स्तंभक गुण असल्याने अतिसार, प्रवाहिका या व्याधीत उत्तम उपयोग होतो.
– डाळिंब रसात टॅनिक ऍसिड आहे. टेपवर्म या कृमीवर उत्तम उपयोग होतो.
– पित्तहर असल्याने याचे सिद्धघृत वापरले जाते.
– डाळिंब अवलेह किंवा रस हा गर्भिणी अवस्थेत होणार्‍या उलट्यांमध्येही उपयुक्त ठरतो.
४. द्राक्षे – मधुर मधुर शीत आहे.
– किंचित कफकर परंतु उत्तम पित्तघ्न आहे.
– यात द्राक्ष शर्करा, कॅल्शियम असते.
– वाळल्यावर याच्या मनुका तयार होतात. बद्धकोष्ठतेसाठी २०-२५ मनुका रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी थोड्या कुस्करून पाण्यासकट खाव्या. मुलांसाठी, गर्भिणीसाठी, वयोवृद्धांसाठी उत्तम मलानुलोमक आहे.
५. अंजीर – पिकलेले अंजीर कषाय, मधुर चवीचे व अल्प उष्ण आहे. यात कॅल्शियम व जीवनसत्व-‘अ’ असते. किंचित सारक आहे. त्वचेचे विकार झालेल्यांनी, विशेषतः कुष्ठासाठी उत्तम.
सुकवलेले अंजीर रात्री दुधाबरोबर घेतल्यास उत्तम पित्तशामक आहे.
६. पेरू – जीवनसत्व-‘क’ भरपूर प्रमाणात आहे. मधुर रसात्मक, मधुर विपाकी व शीत वीर्यात्मक आहे. कफकर आहे म्हणून कास, श्‍वास इ. कफकर विकारांत अयोग्य आहे.
७. पपई – मधुर, कषाय चवीची व उष्णवीर्यात्मक आहे.
– गर्भाशय आकुंचनाचा गुण आहे म्हणून गरोदर स्त्रियांनी सेवन करू नये.
– तसेच मांसाहार पाचनाचा गुण पपईत आहे. म्हणून उत्तम पिकलेली पपई मांसाहार भोजनानंतर सेवन करू शकता.
– पित्तज व्याधी असलेल्यांनी बेताने सेवन करावी.
८. संत्रे-मोसंबी – दोन्ही पिकलेली फळे रुच्य, अग्निदीपक, तृप्ती उत्पन्न करणारी अरुची, उलट्या, इ. रोगात चांगला उपयोग होतो.
संत्र्यामध्ये जीलनसत्व-‘क’ अधिक प्रमाणात आहे. दोन्ही फळे मधुर व शीत आहेत.
– कफज व्याधी झालेल्यांनी सेवन करू नये.
९. अननस – अम्ल, मधुर, शीतवीर्यात्मक, उत्तम पाचक. जावनसत्व-‘क’ने युक्त. याचे सरबत तृप्ती देणारे असून उष्ण ऋतूत सेवन करण्यास योग्य.
१०. शहाळे – याचे पाणी मधुर, शीत, तृप्तीघ्न असून पोटॅशियम, सोडियम या क्षारांनी व शर्करेने युक्त आहे. ज्वर, मूत्रकृच्छ, अश्मरी या व्याधीत अत्यंत उपयोगी आहे.
११. नारळ – नारळाचे खोबरे स्निग्ध, पिष्टमय, प्रथिनयुक्त असून त्यातूनच खोबरेल तेल काढतात.
– पचनास जड आहे पण उत्तम पौष्टीक आहे.
– रस मधुर, विपाक मधुर व उष्ण वीर्यात्मक आहे.
शुष्क फळे (ड्राय फ्रूट्‌स) –
१. खजूर व खारीक ः खजुराचे तांबडा व काळा असे दोन प्रकार आहेत. पैकी काळा खजूर श्रेष्ठ. खजूर वाळवून खारीक करतात.
खजूर मधुर, थंड असून पचनास जड आहे. तो कृमि उत्पादक, तृप्ती करणारा, धातू वाढवणारा, स्निग्ध, रुची उत्पन्न करणारा, हृद्य, पुष्ट व थोडासा मलबंधकर आहे.
– खारकेमध्ये हेच गुण आहेत. फक्त खारीक किंचित रुक्ष आहे. लहान मुलांना दात येताना हातात खारीक द्यायला हवी. त्याने दात बळकट होण्यास मदत होते.
२. पिस्ता ः चवीला गोड, किंचित कडवट, विपाक मधुर, वीर्य उष्ण व पित्तकर असून कफ-वातघ्न आहे. ते पचायला जड व धातुवर्धन करणारे, रक्तदुष्टी नाहिशी करणारे आहेत.
३. काजू ः सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, विपाक मधुर, वीर्य उष्ण असून अत्यंत पित्तकर आहे.
४. बदाम ः शुष्क बदाम-बी मधुर, कषाय, तिक्त, विपाक, मधुर, वीर्य उष्ण असून स्निग्ध, वृष्य, बल्य, पौष्टीक व कफकर आहे.
५. सुके अंजीर ः शुष्क अंजीर चवीला मधुर व शीत वीर्यात्मक असून सारक आहेत.
६. अक्रोड ः आतील गर चवीला तुरट, विपाक, कटू व उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर आणि वातघ्न आहे.

आजकाल फळांच्या सेवनाबद्दल बरेच गैरसमज पसरलेले दिसत आहेत. काहींच्या मते फळांत फ्रु क्टोज जास्त प्रमाणात असल्याने मधुमेह, लठ्ठपणा, हायपरटेन्शन, कोलेस्टेरॉल वाढणे या रोगांत अहितकर असून फळांच्या सेवनानेच हे रोग वाढत आहेत असा काहींचा प्रचार काही प्रमाणात होताना दिसत आहे.
तर फ्रुक्टोज म्हणजे काय? फ्रुक्टोज म्हणजे केवळ फ्रुट शुगर- फळांमध्ये आढळणारी साखर. या फळातील साखरेने रोग उत्पन्न होत नाहीत, तर आपण जे काही आधुनिकीकरण खाद्यपदार्थांमध्ये केलेले आहे त्याने रोगांना आमंत्रण दिलेले दिसते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे सांगायचं झालं तर ताजी फळे ही लघु व पचायला हलकी. पण हीच फळे जेव्हा अन्नाबरोबर किंवा भोजनोत्तर खाल्ली जातात तेव्हा ती पचायला जड असतात. म्हणजेच अन्नपचनाला पहिले सुरुवात होते व ते अन्न पचेपर्यंत फळे तशीच अपाचित आमाशयात पडून राहतात व आंबविण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याचे जेव्हा पचन सुरू होते तेव्हा त्यापासून ‘आम’ची उत्पत्ती होते. या आमापासून वेगवेगळी शरिराला अपायकारक अशी टॉक्सीन्स (विषारी द्रव्ये) बाहेर पडतात ज्यांपासून रोगाची निर्मिती होते.
सध्या प्रचलित असलेले व आवडीने खाल्ले जाणारे विरुद्धान्न म्हणजे
– स्ट्रॉबेरी शूकधान्ये (सिरियल्स) व दुधाबरोबर खाणे.
– केळी ओट्‌सच्या लापशीबरोबर, लापशीमध्ये
– रसबेरीज आणि आईसक्रीम पॅनकेकवर घालून खाणे
– चीज सफरचंद स्नॅक
– दहीसोबत वेगवेगळी फळे
– वेगवेगळ्या फळांचे शेक
– फ्रुटसॅलाड विथ आईस्क्रीम व तेही जेवणानंतर
– केळ्यांचे शिकरण इत्यादी.
अशा प्रकारे आज आपण फळांचे मिश्रण जडान्न, शुकधान्ये, भाज्या, कडधान्ये, दुधाचे पदार्थ इत्यादींबरोबर अहितकररीत्या खात आहोत. मग रोग उत्पन्न होण्याचे मूळ कारण ‘विरुद्धाहारा’लाच आपण खतपाणी नाही का घालत?
आयुर्वेद शास्त्रानुसार फळे खाण्याचे नियम…
– फळे ही नेहमी सकाळी खावीत व कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ नये.
– फळे खाताना दोन-तीन प्रकारची फळे एकत्र खाऊ नयेत.
– फळे नाश्ता म्हणून खाता येतात पण संध्याकाळी नाही.
– उपाशीपोटी तुम्ही फळे खाऊ शकता.
– भिजत घातलेले बदाम, मनुका सकाळी उठल्याबरोबर खावे. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असलेल्यांनी उठल्या उठल्या मनुका-बदाम खाण्याची सवय लावावी व फरक पहावा.
– फळांपैकी केळी, सफरचंद, पिअर, पिच, किवी, आंबा ही फळे सकाळी खावीत.
– आंबट फळे ः लिंबू, संत्रे, डाळिंब, द्राक्षे इत्यादी सकाळी दहा व संध्याकाळी तीनच्या अगोदर खावीत.
– टरबूज, कलिंगड ही फळे सकाळी स्नॅक म्हणून सकाळी ११ ते् संध्याकाळी ५ पर्यंत कधीही खाता येतात.
– फळांचे रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खावे.
– फळांपेक्षा फळांचे रस जास्त गुरू असल्याने फळांच्या रसामध्ये आल्याचा रस किंवा थोडीशी सुंठ घातल्यास पचण्यास हलका होतो.
– फळांचा रस पिताना त्यात साखर किंवा बर्फ न घालता प्यावा.
– सुक्या मेव्यातील आर्द्रता नष्ट झाल्याने ते जडान्न बनते व दुधाच्या पदार्थांमध्ये किंवा धान्य व भाज्यांमध्ये त्याचा वापर होऊ शकतो.
– पूर्ण फळ खावे व एका वेळेला एकाच प्रकारची फळे खावीत.
– फळे ही त्या त्या ऋतूंत मिळणारी व आपल्या प्रदेशात सहज उत्पन्न होणारी फळेच खावीत.
– कोणतीच फळे मीठ लावून खाऊ नयेत.
– ताजी फळे उष्ण ऋतूंत व सुका मेवा थंड ऋतूंत असे साधे फळांच्या सेवनाचे नियम पाळून फळे खाल्ल्यास आपल्याला सगळ्या प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

सॅनिटायझेशन – मास्क – सोशल डिस्टंसिंग (एस्‌एम्‌एस्)

डॉ. मनाली पवार हे जे कोरोना योद्धा दिवसरात्र कार्यरत आहेत, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठीच. त्यामुळे घरात- बाहेर कुठेच...

भारतीय संस्कृतीची महती

योगसाधना - ५१६अंतरंग योग - १०१ डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय संस्कृतीतील अशा गोष्टी अत्यंत विलोभनीय...

‘पंचप्राण’ आणि त्यांचे कार्य योगसाधना – ५१४ अंतरंग योग – ९९

डॉ. सीताकांत घाणेकर आपल्या जीवनातून निरुपयोगी गोष्टी फेकून देता आल्या पाहिजेत. हलक्या प्रकारचे रागद्वेष, खोटे अहंकार, अविवेकी क्रोध...

बायोस्कोप कॅलिडोस्कोप

प्रा. रमेश सप्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कॅलिडोस्कोप कालचक्र नि घटनाचक्र यानुसार बदलतच असतो. मुख्य भूमिका पाहणार्‍याची म्हणजे प्रत्येकाची...

‘गाऊट’वर प्रभावी होमिओपॅथी (वातरक्त किंवा संधी रोग)

डॉ. आरती दिनकर(होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक) ‘गाऊट’मधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते....