28 C
Panjim
Wednesday, December 2, 2020

फटाकेमुक्त दिवाळी

येत्या दिवाळीच्या काळात हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याचा धडाका विविध राज्यांनी लावला आहे. हरित लवादानेही या विषयात लक्ष घातल्यामुळे काल देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील या दिवाळीत सर्व प्रकारच्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली. आतापर्यंत कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, मध्य प्रदेश, उडिशा ते अगदी सिक्कीमपर्यंत विविध राज्यांनी या दिवाळीच्या काळामध्ये फटाक्यांच्या विक्री वा वापरास मनाई केली आहे. गोवा सरकार मात्र नेहमीप्रमाणे या विषयावर अद्याप सुस्त आहे. राष्ट्रीय हरित लवादाने आता केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयालाच फटाके बंदीबाबत नोटीस बजावलेली असल्याने केंद्र सरकारकडून निर्देश आल्यावरच गोव्यात यासंदर्भात काही हालचाल होऊ शकेल.
मोठ्या प्रमाणात लावल्या जाणार्‍या फटाक्यांमुळे होणारे हवेतील प्रदूषण मानवी आरोग्यास घातक असते हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्या तर कोरोना महामारीचा फैलाव सर्वत्र असल्याने आणि मुख्यत्वे हा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे या हवेतील प्रदूषणामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आजार अधिक बळावू शकतो, जगभरातील कोरोनाच्या एकूण मृत्यूंपैकी पंधरा टक्के मृत्यू हे हवेतील प्रदूषणामुळे ओढवल्याचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळामध्ये तरी हवेतील प्रदूषण कसे जास्तीत जास्त कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे जरूरीचे आहे. उत्तर भारतामध्ये, विशेषतः दिल्लीसारख्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये हवेतील प्रदूषण ही एक बिकट समस्या बनत असते. धुक्यासारखी दिसणारी, परंतु प्रत्यक्षात प्रदूषणामुळे निर्माण होणारी ‘धुंद’ येत्या हिवाळ्याच्या दिवसांत दिल्ली व आसपासच्या पठारी प्रदेशांमध्ये पसरलेली सर्रास पाहायला मिळते. विमानोड्डाणेसुद्धा त्यामुळे रद्द करावी लागतात. पंजाब आणि हरियाणासारख्या शेतीप्रधान राज्यांमध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळल्या जाणार्‍या तणामुळे हवेत पसरलेला धूर दिल्लीपर्यंत येऊन दिल्लीची हवा प्रदूषित करीत असल्याचा विषय तर जुनाच आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यात फटाक्यांची भर नको म्हणून हरित फटाक्यांचा पर्याय दिलेला होता. मात्र, यावेळी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘हरित’ फटाक्यांसह सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी आलेली आहे.
फटाक्यांच्या वापराला आळा घालायचा असेल तर खरे म्हणजे कायदेशीर बंदीपेक्षा नागरिकांमधील जनजागृती अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल. फटाक्यांतून सोडल्या जाणार्‍या विषारी धुराचे मानवी आरोग्यावर किती घातक परिणाम होतात याची माहिती जनसामान्यांपर्यंत सातत्याने गेली पाहिजे. विशेषतः शालेय मुलांमध्ये ही जाणीवजागृती झाली तर उद्याची पिढी फटाक्यांपासून आपोआप दूर जाईल. ‘हरित’ फटाक्यांतून सोडला जाणारा सल्फर डायऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड हा नेहमीच्या फटाक्यांपेक्षा तीस टक्के कमी असतो हे खरे असले तरी मोठ्या प्रमाणावर हे फटाके फोडले जातात तेव्हा शेवटी लेखाजोखा एकच होतो. त्यामुळे फटाक्यांचा दणदणाट करून आणि प्रचंड धूर निर्माण करून त्यातून आसुरी आनंद मिळवण्याची ही प्रवृत्तीच मुळात नाहीशी झाली पाहिजे.
फटाके हा आपल्या देशातील मोठा कुटिरोद्योग आहे आणि लाखो लोक त्याच्या उत्पादन व विक्रीवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका फटक्यात बंदी लादून या व्यवसायात गुंतलेल्यांचे व्यावसायिक नुकसान करण्याऐवजी नियोजनबद्ध रीतीने फटाकेमुक्तीसाठी प्रयत्न होणे अधिक उपकारक ठरेल. आज आपल्या देशामध्ये चिनी फटाके मोठ्या प्रमाणावर येत असतात. मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी त्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने या चिनी फटाक्यांवर सरसकट बंदी घातली पाहिजे.
फटाकेबंदीचा विषय केवळ दिवाळीपुरताच पुढे का म्हणून आणला जावा? भारतामध्ये गनपावडरचा वापर सुरू झाला तेव्हापासून म्हणजे पंधराव्या शतकापासूनच दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास सुरूवात झाली असावी असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून जर हा विषय ऐरणीवर आणला गेलेला असेल तर तो सर्व धर्मांना, सर्व पंथांना सारखाच लागू व्हायला हवा. सुरुवात तर राजकारण्यांपासून करायला हवी, कारण प्रत्येक निवडणुकीतील विजयानंतर फटाक्यांचा दणदणाट करण्यात नेतेमंडळी आणि त्यांचे अनुयायीच सर्वांत पुढे असतात. खेळातील विजयानंतर देखील रात्री बेरात्री फार मोठ्या प्रमाणात फटाके लावून विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. त्यातून आजूबाजूच्या लोकांना – विशेषतः रुग्णांना होणार्‍या उपद्रवाचा विचारही अशा प्रसंगी संबंधितांकडून केला जात नाही.
कोणताही सण उत्सव साजरा करीत असताना त्याचे मर्म समजून तो साजरा करणे अधिक महत्त्वाचे असते आणि आनंददायीही!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

फक्त सोहळा नको

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...

कोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा

>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...

नोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...

स्पष्टतेची गरज

दिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...