गुजरात येथील बनासकांठामधील फटाका कारखान्यात स्फोट झाल्याने काल भीषण आग लागली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. काल सकाळी ही घटना घडली. स्फोट इतके भीषण होते की छताचा भाग खाली कोसळला. त्या ढिगाऱ्याखालीही लोक अडकल्याची भीती आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले होते. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

