काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यावेळी काँग्रेसने विधानसभेच्या 294 पैकी 284 जागांवरील उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजप आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने विधानसभेच्या 294 पैकी 284 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. याबाबत काल रविवार काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने मालदा आणि मुर्शिदाबाद या पक्षाचा प्रभाव असलेल्या भागात पक्षाची पकड भक्कम करण्यावर भर दिला आहे.

