प्ले बॉय क्लबला युवक कॉंग्रेसचा विरोध

0
58

गरज भासल्यास आंदोलन

गोव्यात प्ले बॉय क्लब सुरू करण्यास प्रदेश युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध असून गरज भासल्यास या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे प्रदेश युवक कॉंग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी काल सांगितले.

या विषयावर सरकारने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसनेही प्ले बॉय क्लब सुरू करण्यास विरोध केला आहे.

वरील संकल्पना गोव्याच्या संस्कृतीला बाधक ठरेल. त्यामुळे प्रत्येकाने त्यास विरोध करावा, असे आवाहन कुतिन्हो यांनी केले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्ले बॉय क्लबची गरज असून येथील समुद्र किनारे, मंदिरे, चर्चेस व येथील संस्कृतीच पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्या म्हणाल्या. वरील प्रकार येथे सुरू झाल्यास गोव्याची बदनामी होईल, असे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी बसगाड्या सुरू करण्याच्या निर्णयाचे कुतिन्हो यांनी स्वागत केले आहे. आपल्या संघटनेने महिलांसाठी बसगाड्या सुरू करण्याची पूर्वीपासून मागणी केली होती, असे त्या म्हणाल्या.