प्रिय वाचक

0
219

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्र्वभूमीवर सध्या दैनिक नवप्रभाच्या प्रकाशनामध्येही अनेक अडथळे येत आहेत. तरीही या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये वाचकांना राज्यातील व देशातील घडामोडींबाबत अवगत करण्याचे काम आम्ही निर्धारपूर्वक करीत आहोत. सध्याच्या  परिस्थितीत आमचा अंक सर्वच वाचकांपर्यंत पोहोचवणे शक्य होत नाही याची आम्हाला जाणीव आहे. तांत्रिक अडचणींमुळे ईपेपरचे प्रकाशनही आम्ही स्थगित ठेवले आहे. मात्र, या संकेतस्थळावरून महत्त्वाच्या बातम्यांचा गोषवारा नियमितपणे देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वाचकांनी आमची अडचण समजून घ्यावी ही नम्र विनंती.

गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

-संपादक