Home बातम्या प्रादेशिक आराखड्याची अधिसूचना मागे घ्या

प्रादेशिक आराखड्याची अधिसूचना मागे घ्या

0

पिळर्ण सिटीझन फोरमची मागणी

प्रादेशिक आराखडा २०२१मध्ये प्रचंड त्रुटी असून त्याची अधिसूचना मागे घेण्यात यावी व सहा महिने तो प्रलंबित ठेवून लोकांनी केलेल्या सूचनांनुसार त्यात दुरुस्त्या घडवून आणाव्यात अशी मागणी काल पिळर्ण सिटीझन फोरमने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

गोवाभरातील विविध पंचायतींनी व अन्य बिगर सरकारी संघटनांनी मिळून सुमारे २३०० लेखी निवेदने देऊन प्रादेशिक आराखड्यात दुरुस्त्या घडवून आणण्याची मागणी केली असल्याचे पिळर्ण सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. गावागावात जे १५ किंवा २० मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते दाखवण्यात आलेले आहेत त्याला फोरमने तीव्र हरकत घेतली असून या रस्त्यांसाठी बिल्डर न्यायालयात जातील व ते करण्यासाठी लोकांची घरे व कुंपणेही मोडण्यात येतील, अशी भीती फोरमने व्यक्त केली. १६ रोजी आझाद मैदानावर जाहीर सभा होणार असून गोवा भरातील बिगर सरकारी संघटना या सभेतून सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणावीत, असे ते म्हणाले.