प्राथमिक शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांचा १७ रोजी संवाद

0
11

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक, पालक, पालक-शिक्षक संघाचे सदस्य यांच्याशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शाळांचे विलिनीकरण, मूलवर्धन शिक्षण संकल्पना आणि मध्यान्ह आहार कार्यक्रम आदी विषयांवर संवाद साधणार आहेत.

सरपंच आणि पंच सदस्य यांच्याशी दोन तासांच्या आभासी संवाद कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात सर्व प्राथमिक सरकारी व सरकारी अनुदानित शाळा सहभागी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा संवाद कार्यक्रम गोव्यातील शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेले विविध उपक्रम समजून घेण्यास मदत करील आणि मूल्यवर्धन मॉड्यूलने गोव्यात आणलेला बदल पालक आणि इतरांनाही समजेल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी, राज्यातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षकांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. त्याच दिवशी शिक्षण खाते निपुण भारत मिशनचा शुभारंभही करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.